Posts

Showing posts from June, 2019

मानवाची प्रगती,निसर्गाची अधोगती

पाणी कदाचित अस तत्व ज्यात सृष्टी निर्माण, बचाव आणि अंत करण्याची क्षमता आहे. संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे. पण याच पाण्याची कमतरता गेल्या काही वर्षांपासून आपल्याला भासत आहे आणि ती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. पाण्याची कमतरता म्हणजे दुष्काळ. दुष्काळ हा गेल्या काही वर्षांपासून नियमित असा झाला आहे.तरी सुद्धा आपण दरवर्षी या दुष्काळाच्या सामना करण्यास अपयशी ठरतो.याची कारणं काय असावीत अपुऱ्या उपाययोजना? पावसाची कमतरता? काही वर्षांपासून पडणारा दुष्काळ हा नैसर्गिक म्हणावा की मानवनिर्मत? निसर्गाच्या डोक्यावर खापर आपण नेहमीच फोडतो आणि मोकळे होतो. दुष्काळी परिस्थितीत पावसाने पाठ फिरवली, पाऊस रुसला हे हमखास ऐकायला भेटत पण त्या पावसाने पाठ का फिरवली याची कारणे आपण कधी शोधली का? काल जागतिक पर्यावरण दिन झाला. पण राज्याच्या ४२% भागात दुष्काळ असताना पर्यावरण दिवस साजरा करायचा तो कसा? या ४२% भागातील दुष्काळाची झळ किती शहरांना जाणवते? की या ४२% मध्ये फक्त ग्रामीण भाग च येतो? पाण्या सारख्या मूलभूत तत्त्व साठी सुद्धा खेडे आणि शहरे यात एवढी विषमता का अस