Posts

Showing posts from May, 2019

मूलभूत कर्तव्य. जबाबदारी की गरज?

वेळ असेल १०-१०.३०.... बदलापूर वरून डोंबिवलीला ट्रेनने येत होतो. उशीर झाल्याने ट्रेन तशी रिकामीच होती. बाजूलाच आमच्या एका कुटुंबाचे चाललेले संभाषण कानावर आलं.... देशाच्या सध्याच्या स्थितीवर, भविष्यावर त्यांचं संभाषण चालू होतं. चालली होती. काही राजकीय पक्षांची निंदानालस्ती... अचानक त्यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस राजकीय पक्षांबद्दल बोलण्यास अडविले. त्या व्यक्तीने प्रत्युत्तर म्हणून मूलभूत हक्कांचा विषय काढला व त्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आठवण करून दिली. मग संविधानातील मुलभूत हक्कांवर त्यांची चर्चा सुरू झाली. संभाषणादरम्यान त्यातील एका व्यक्तीने गुटखा चघळून लाल भडक झालेल्या तोंडातून आपल्या लाळेची पिचकारी अतिशय कलात्मक रीत्या ट्रेनच्या एका कोपऱ्यात मारली तर दुसऱ्याने संत्री व केळ्याचे साल काढून अगदी सहजरित्या ट्रेनच्या खिडकी बाहेर फेकून दिले. हे दृश्य पाहून मला आणि माझ्या मित्राला प्रश्न पडला की ज्या संविधानातील मूलभूत हक्कांविषयी ते बोलत होते त्याच संविधानाने आपल्याला काही ही मूलभूत कर्तव्ये सोपविली आहेत याचा त्यांना विसर कसा काय पडला? संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे ह

गीतकार राष्ट्रगीताचा

गीतकार राष्ट्रगीताचा    19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस ज्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात, संगीतात अमुलाग्र बदल घडले असे थोर बंगाली कवी ब्राम्हो पंथीय नाटककार, चित्रकार म्हणजे टागोर .... रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर.           ७ मे १८६१ रोजी कलकत्त्याच्या पिरली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी अवघ्या आठव्या वर्षी   पहिली कविता लिहिली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरंच ..... रवींद्रनाथ यांना “ गुरुनाथ” या नावाने देखील संबोधले जायचे . अकराव्या वर्षी वडिलांसोबत भारत - भ्रमणार्थ त्यांनी कोलकत्ता सोडले आणि सुरू झाला प्रवास सामान्य मधून उठून काही असामान्य गोष्टी करण्याचा . १८७७ मध्ये गुरुनाथ त्यांच्या काव्य रचनेतून सर्वप्रथम लोकांसमोर आले मग हळूहळू काव्यसंग्रह कथा, नाटके, संगीत आणि दीर्घ नाटके, ग्रंथ अशा अनेक गोष्टींतून त्यांनी आपले लिखाण,  आपले विचार लोकांसमोर मांडले. त्यांच्या "गीतांजली" या काव्यसंग्रहासाठी   १९१३ मध्ये त्यांना

महाराष्ट्र दिन विशेष

इतिहासाच्या गल्लीतील,भविष्याची भीती                १५ ऑगस्ट १९४७ ... असंख्य बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेला दिवस . स्वतंत्र भारताची जडण - घडण करताना आपल्या सरकरने उचललेलं पाहिलं पाऊल म्हणजे भाषावार प्रांतरचना . त्यावेळी " बॉम्बे प्रेसिडेंसि " हे एक राज्य होत , ज्यात महाराष्ट्रातील ठाणे , मुंबई व कोकणसह गुजरात मधील काही भाग समाविष्ट होता . त्याकाळच्या काही प्रभावशाली व्यक्तींना मुंबई ही गुजरात मध्ये समाविष्ट व्हावी असे वाटत असताना जनमताचा कौल मात्र काही वेगळेच दर्शवत होता . याच सामान्य जनतेतून नेतृत्व म्हणून   सरसावलेल्या प्र . के . अत्रे , प्रबोधनकार ठाकरे , सेनापती बापट , शाहीर अमर शेख इत्यादींच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली . या चळवळीतून दिल्या गेलेल्या १०६ प्राणांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी उदय झाला आजच्या महाराष्ट्राचा.               ह्या महाराष्ट्राने अनेक महान व्यक्तिमत्व आपल्या मातीत घडवली . अगदी महाराजांपासून टिळकांपर्यंत , फाळकेंपासून   लता