गीतकार राष्ट्रगीताचा


गीतकार राष्ट्रगीताचा  

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस ज्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात, संगीतात अमुलाग्र बदल घडले असे थोर बंगाली कवी ब्राम्हो पंथीय नाटककार, चित्रकार म्हणजे टागोर....रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर.
          मे १८६१ रोजी कलकत्त्याच्या पिरली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी अवघ्या आठव्या वर्षी  पहिली कविता लिहिली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरंच..... रवींद्रनाथ यांनागुरुनाथ” या नावाने देखील संबोधले जायचे. अकराव्या वर्षी वडिलांसोबत भारत-भ्रमणार्थ त्यांनी कोलकत्ता सोडले आणि सुरू झाला प्रवास सामान्य मधून उठून काही असामान्य गोष्टी करण्याचा. १८७७ मध्ये गुरुनाथ त्यांच्या काव्य रचनेतून सर्वप्रथम लोकांसमोर आले मग हळूहळू काव्यसंग्रह कथा, नाटके, संगीत आणि दीर्घ नाटके, ग्रंथ अशा अनेक गोष्टींतून त्यांनी आपले लिखाण, आपले विचार लोकांसमोर मांडले. त्यांच्या "गीतांजली" या काव्यसंग्रहासाठी  १९१३ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. भारतातीलच नव्हे तर आशियातील प्रथम व्यक्ती ज्यांना साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे आपल्या देशाचे वैभवच नाही का...? गीतांजली हा इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेला त्यांचा  पहिला संग्रह होता. २० डिसेंबर १९१५ मध्ये त्यांना कलकत्ता विद्यापीठाने साहित्याची डॉक्टरेट दिली. जून १९१५ मध्ये त्यांना "KNIGHTHOOD" हा त्याकाळातील ब्रिटिश भारतातील सर्वोच्च सन्मानसुद्धा दिला गेला. परंतू १९१९ मध्ये झालेल्या जालियानवाला भाग च्या भयावह घटनेनंतर त्यांनी तो ब्रिटिश सरकारला परत केला.
            चार भिंतींमध्ये १०×१० च्या चौकटीत शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाला, वर्गाला, त्या शैक्षणिक पद्धतीला त्या काळात खुलेआम आव्हान देऊन रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतःचे विद्यापीठ सुरू केले. जणू त्यांना माहित होते की माणुसकी आणि शिक्षण हे चार भिंतीत शिकता येणार नाही , तर बाहेरील कटू दुनिया वेगवेगळे अनुभव ह्या गोष्टी शिकवतील ही दूरदृष्टी गुरुनाथ यांना खूप लवकरच आत्मसात झाली होती... काय हा ध्यास येणारा उद्याचा भारत घडवण्यासाठी….!
              आपल्या देशाचा सन्मान, आपली शान, आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर ह्यांनीच लिहिले आहे . एवढंच नव्हे तरआमार शोनार बांगला” हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत ही ही रवींद्रनाथ यांनी लिहिलेले आहे आणि आणि श्रीलंकेचे राष्ट्रगीत हे मूळ १९३८ मध्ये रवींद्रनाथांनी लिहिलेले एक बंगाली गाणे आहे, ज्याला नंतर श्रीलंकन भाषेमध्ये भाषांतरित करून १९५१ मध्ये श्रीलंकेचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. ज्ञानाचे रंग चौफेर उधळणारे रवींद्रनाथ टागोर ही अशी एकमेव व्यक्ती आहे हे ज्यांनी तीन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिले आहे.
                रवींद्रनाथ टागोर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे कायमच प्रेरणास्थान राहिले आहे. शिवाजी महाराजांवर टागोर यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. संत तुकारामांच्या अभंगाचा टागोरांनी सखोल अभ्यास केलेला आहे. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित सुद्धा केले आहेत. रवींद्रनाथ यांना मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु. ल. देशपांडे स्वतः बंगाली भाषा शिकले.
                परिणिता, काबुलीवाला सारखे रवींद्रनाथ यांवर निघालेले बंगाली चित्रपट, दृष्टिदान ही मराठी लघुकथा, अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारा वार्षिकोत्सव ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाचीच बाब आहे. असंख्य नाटके, कवितासंग्रह, दीर्घ नाटकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे असे नाटककार, लेखक, कवी, जीवनाचा अर्थ, विचार विकसित करून लोकांसमोर आदर्श मांडणारे आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांविरुद्ध लढून देशाच्या स्वातंत्र्यात आपला मोलाचा वाटा असणारे रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या १५८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

-    श्री अनिल नलावडे


Comments

  1. खूप सुंदर... महाराष्ट्रात रवींद्रनाथ टागोरांबद्दल तितकीशी माहिती लोकांना नाही... यानिमित्ताने बरीच माहिती मिळाली..

    ReplyDelete
  2. Play free slots online - Kadang Pintar
    KADG PENTAR: Play 온카지노 online casino slot games. We offer a casino site where you can 카지노 play real money casino games. Play slots games for septcasino fun.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मानवाची प्रगती,निसर्गाची अधोगती

महाराष्ट्र दिन विशेष