मानवाची प्रगती,निसर्गाची अधोगती

पाणी कदाचित अस तत्व ज्यात सृष्टी निर्माण, बचाव आणि अंत करण्याची क्षमता आहे. संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे. पण याच पाण्याची कमतरता गेल्या काही वर्षांपासून आपल्याला भासत आहे आणि ती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. पाण्याची कमतरता म्हणजे दुष्काळ. दुष्काळ हा गेल्या काही वर्षांपासून नियमित असा झाला आहे.तरी सुद्धा आपण दरवर्षी या दुष्काळाच्या सामना करण्यास अपयशी ठरतो.याची कारणं काय असावीत अपुऱ्या उपाययोजना? पावसाची कमतरता? काही वर्षांपासून पडणारा दुष्काळ हा नैसर्गिक म्हणावा की मानवनिर्मत? निसर्गाच्या डोक्यावर खापर आपण नेहमीच फोडतो आणि मोकळे होतो. दुष्काळी परिस्थितीत पावसाने पाठ फिरवली, पाऊस रुसला हे हमखास ऐकायला भेटत पण त्या पावसाने पाठ का फिरवली याची कारणे आपण कधी शोधली का?

काल जागतिक पर्यावरण दिन झाला. पण राज्याच्या ४२% भागात दुष्काळ असताना पर्यावरण दिवस साजरा करायचा तो कसा? या ४२% भागातील दुष्काळाची झळ किती शहरांना जाणवते? की या ४२% मध्ये फक्त ग्रामीण भाग च येतो? पाण्या सारख्या मूलभूत तत्त्व साठी सुद्धा खेडे आणि शहरे यात एवढी विषमता का असावी? दुष्काळाची झळ शहरांना न  कारण काय? पुरेश्या उपाययोजना? पाण्याचा जपून वापर? मोठ्या शहरात पाण्याची जेवढी नासाडी होते,जेवढं दुरुपयोग होतो तेवढं कदाचित कुठेच नाही होत. कधी पाण्याची पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात, तर कुठे फक्त मजा करण्यासाठी रिसॉर्ट आणि स्विमिंग पुल मध्ये हजारो लिटर पाणी वापरल जात. शहरातील पावसाचं पाणी सुद्धा वाहून नाले आणि गटारातच जात. पण हे सर्व पाणी येत कुठून? मुंबई,पुण्या सारख्या शहराना पाण्याचा स्त्रोत तर नाही, त्यांना पाणी पुरवलं जात ते त्याच्या पासून कितीतरी किलोमीटर दूर असलेल्या जलाशयातून. अशी जलाशये जी कोणती तरी खेडी,गाव विस्थापित करून बनवली जातात पण त्याच गाव खेड्याच्या लोकांना पाणी मिळत नाही ही बाब योग्य आहे का? मान्य आहे शहरांना पाणी पुरवठा झालाच पाहिजे. शहरातील बरेचसे व्यवसाय, उद्योग पाण्यावर अवलंबून असतात पण गावच पाणी पळवून शहरांना देणं योग्य आहे का? पाण्यावर सर्वांचा समान हक्क असताना एवढी तफावत का असावी? शहरे आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देतात खर आहे पण खेडी सुद्धा जीवनावश्यक अन्नधान्य पुरवठा हे ही खरच आहे.

पाण्याची विषमता तर आपण बघितली. पण त्याची कमतरताच नसेल तर विषमतेचा प्रश्नच उद्भवत नाही. पण ही कमतरता का जाणवते? आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या २१व्या शतकात सुद्धा सगळे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या हाती असताना सुद्धा आपण दुष्काळाचा सामना करण्यास असमर्थ का आहोत? कदाचित निसर्गावर अधूनिक्तवाचा प्रभाव पडत नसावा. निसर्ग ईश्वराच अस रूप आहे जे माणसाला देतय तो पर्यंत भरघोस देणार, पण त्याने परत घ्यायला सर्वात केल्यावर त्याला कोणतीच प्रार्थना, कोणतीच पूजा,उपासना नाही थांबवू नाही शकणार. आपण वेळीच सावध झालो नाही तर खेडेगावातील दुष्काळाची झळ शहरात पोचायला वेळ लागणार नाही. गेल्या ६५ वर्षातील सर्वात भीषण दुष्काळी परस्थिती आज निर्माण झाली आहे. मराठवाडा सारख्या भागात पाण्याच्या एक एक थेंब साठी खूप धडपड करावी लागते आहे. देशात फक्त २% पाणी साठा शिल्लक असताना सुद्धा पाऊस पडण्याचे काही लक्षण दिसत नाही. ही परिस्थिती आपल्यावर का उद्भवली असेल?
प्रदूषण,वृक्षतोड यासारखी अनेक कारणे आपल्याला माहिती आहेत, पण त्या वरच्या उपाययोजना कोणत्या? पाणी अडवा,पाणी जिरवा हे वाक्य फक्त दुष्काळात का आठवत आपल्याला? पाऊस पडत असताना, सर्व पाणी वाहून जात असताना का विसर पडतो आपल्याला त्याचा?
दुष्काळाच्या उपाययोजना फार सोप्या असतात त्या साठी आधुनिक सामग्री च पाहिजे असं नाही, अस असता तर कदाचित शाहू  महाराजांच्या काळात पडलेलं दुष्काळाचा सामना त्यांना करता नसता आला. सरकारच्या सर्व योजना चालू आहेतच, पण नागरिकांच्या सहभागाशिवाय त्या योजना अपुऱ्या आहेत. शहरातील ज्या भागात २४ तास पाणी पुरवठा आहे त्या भागातील पाणी जर १ दिवस बंद करून खेडे गावात पुरवलं तर आठवडाभर त्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही. शोषखड्डा बनवणे हे बिल्डिंग बांधताना बंधनकारक आहे पण किती ठिकाणी हा नियम पाळला जातो? सरकार सर्वच ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही त्यासाठीच सरकारी कर्मचारी नियुक्त केलेले असतात. जर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम नियमात राहून आणि पूर्ण इमानदारीने पूर्ण केले तरी सुद्धा दुष्काळ बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. दुष्काळ ही फक्त सरकारी समस्या नसून ती एक नागरिक समस्या आहे त्या साठी योजना प्रत्येक नागरिकाने सुद्धा केली पाहिजे. आपण आपले मूलभूत कर्तव्य  पाण्याचा जपून वापर,निसर्गाचे जतन, झाडे लावणे ती जगवणे अशी काही कर्तव्य जरी पर पडली तरी दुष्काळाशी सामना करण्यास आपण हातभार लावू शकतो. छत्रपती शिवाजी महााजांच्या काळात कधीही पाण्याची कमतरता जाणवली नाही त्यांनी अशा काय उपाययोजना केलेल्या त्याच्या अभ्यास करून जर त्या आपण अमलात आणू शकलो तरी दुष्काळ कमी होण्यास मदत होईल. आज सरकार प्रमाणेच काही वैयक्तिक संस्था सुद्धा दुष्काळा वर मात करण्यासाठी हाठभार लावता आहेत. पाणी फाऊंडेशन, नानासाहेब धर्मािकारी प्रतिष्ठान यासारख्या काही संस्था पुरेश्या उपाययोजना करत आहेत पण त्यात आपला सुद्धा हातभार लागण  गरजेचं आहे. अंबाबाई मंदिर प्रतिष्ठान सारख्या धार्मिक संस्थांनी सुद्धा दुष्काळग्र्तांसाठी मदत दिली आहे.पण यासारख्या आणखी मदतीच्या हातांची गरज आहे.

आधुनिकतेच्या दृष्टीने वाटचाल करताना आपण निसर्गाचा द्वेष ओढवून घेतोय. हे वेळीच थांबवू नाही शकलो तर पुढच्या पिढीला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. कुटुंब नियजन करताना जरा भविष्याचा विचार करतो तसाच आपण निसर्गाचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण जर निसर्ग कोपला आणि सूर्षतीचा नाश झाला तर कुटुंब नियोजनाचा सुद्धा काही उपयोग होणार नाही.आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय याचा विचार आपण केला पाहिजे.

                                                       -अभिषेक फाटक

Comments

  1. Lucky Club - Live Casino Website
    Lucky Club is a leading operator of Live Casino and is an excellent choice of Live Casino games for live roulette, baccarat, luckyclub.live blackjack and Minimum deposit: C$10Welcome Bonus: 100% up to C$150

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीतकार राष्ट्रगीताचा

महाराष्ट्र दिन विशेष