गीतकार राष्ट्रगीताचा 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस ज्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात, संगीतात अमुलाग्र बदल घडले असे थोर बंगाली कवी ब्राम्हो पंथीय नाटककार, चित्रकार म्हणजे टागोर .... रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर. ७ मे १८६१ रोजी कलकत्त्याच्या पिरली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी अवघ्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरंच ..... रवींद्रनाथ यांना “ गुरुनाथ” या नावाने देखील संबोधले जायचे . अकराव्या वर्षी वडिलांसोबत भारत - भ्रमणार्थ त्यांनी कोलकत्ता सोडले आणि सुरू झाला प्रवास सामान्य मधून उठून काही असामान्य गोष्टी करण्याचा . १८७७ मध्ये गुरुनाथ त्यांच्या काव्य रचनेतून सर्वप्रथम लोकांसमोर आले मग हळूहळू काव्यसंग्रह कथा, नाटके, संगीत आणि दीर्घ नाटके, ग्रंथ अशा अनेक गोष्टींतून त्यांनी आपले लिखाण, आपले विचार लोकांसमोर मांडले. त्यांच्...